Auto Rickshaw Taxi Fare in Mumbai : प्रत्येक मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी...आजपासून मुंबईत टॅक्सी (Taxi Fare) आणि रिक्षा दरवाढ (Auto Rickshaw) झाली आहे. पहिलेच महागाईचा बोजा त्यात टॅक्सी आणि रिक्षाची दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे कंबरड मोडलं आहे. आजपासून मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे.
(1 October Auto Rickshaw Taxi fare in Mumbai nm)
ऑटो रिक्षासाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये मोजावे लागणार आहे. पहिल्या 1.5 किमीसाठी ही पैसे असणार असून त्यापुढे प्रत्येक किमीसाठी 14.20 रुपये, टॅक्सीसाठी याच अंतरासाठी 25 रुपयांऐवजी 28 रुपये आणि पुढे प्रत्येक किमीसाठी 15.33 रुपये, कूल कॅबसाठी 33 ऐवजी 40 रुपये आणि पुढे प्रत्येक किमीसाठी 22.26 रुपये मोजावे लागतील.
ऑटो भाडेवाढ - 1.5 किमी अंतरासाठी किमान भाडे ₹21 वरून ₹23 पर्यंत वाढले
1 ऑक्टोबरपासून मुंबईतील प्रवाशांना 14.20 रुपये (प्रति किमी) ऐवजी 15.33 रुपये प्रति किमी मोजावे लागतील.
टॅक्सी भाडेवाढ - 1.5 किमी अंतरासाठी किमान भाडे ₹25 ते ₹28 पर्यंत वाढले
1 ऑक्टोबरपासून मुंबईतील प्रवाशांना 16.93 रुपये (प्रति किमी) ऐवजी 18.66 रुपये प्रति किमी मोजावे लागतील. ब्लू-सिल्व्हर 'कूल' कॅब टॅक्सी - किमान मूळ भाडे ₹33 प्रति किमी वरून ₹40 प्रति किमी करण्यात आले आहे आणि त्यानंतर या कॅबसाठी प्रति किमी भाडे ₹26.71 होईल.
मुंबईतील ऑटोरिक्षा आणि टॅक्सींचे वाढलेले भाडे पेट्रोल आणि सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सींना लागू असल्याचे एमएमआरटीएने म्हटलं आहे. टॅक्सी आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यात सुधारणा करण्यात आली कारण CNG ची किंमत 1 मार्च 2021 रोजी प्रति किलो ₹ 49.40 वरून ₹ 80 प्रति किलो करण्यात आली होती, याशिवाय राहणीमानाचा वाढता खर्च, महागाई आणि इतर कारणांमुळे भाडे देखील वाढवण्यात आले आहे.