मोठी बातमी । मुंबईत नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांना बंदी

ओमायक्रॉनचे सावट असल्याने 31 डिसेंबर सेलिब्रेशनला बंदी आहे. याबाबत मुंबई महापालिकेकडून आदेश जारी केले आहेत.

Updated: Dec 25, 2021, 01:31 PM IST
मोठी बातमी । मुंबईत नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांना बंदी title=
संग्रहित छाया

मुंबई : Omicron variant : कोरोनाचा धोका वाढत आहे. राज्य सरकारने रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आता मुंबईत नववर्षाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. ओमायक्रॉनचे सावट असल्याने 31 डिसेंबर सेलिब्रेशनला बंदी आहे. याबाबत मुंबई महापालिकेकडून आदेश जारी केले आहेत.(Covid-19: All New Year gatherings banned in Mumbai)

राज्यात कोविड रुग्णांची संख्या (Covid cases) 1,410 वर पोहोचली आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात कोनाचा संसर्गाचा धोका अधिक आहे. ओमायक्रॉनचे रुग्णही सापडत आहे. त्यामुळे बीएमसीने नवीन वर्षाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.

यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरातूनच करावे लागणार आहे. मुंबई महापालिकेने 31 डिसेंबरचे कार्यक्रम बंदीस्त आणि खुल्या जागेत साजरे करण्यास आणि नववर्षाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यासही निर्बंध घातले आहेत. 

गेट वे ऑफ इंडिया, जूह बीच, मोठ-मोठी हॉटेल्स आणि सार्वजनिक ठिकाणीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र, ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या 108 वर गेल्याने आणि वाढत्या संकटामुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.