राज्यात गेल्या २४ तासांत ५५२ नवे कोरोना रुग्ण

मुंबईत सर्वाधित 419 रुग्ण वाढले.

Updated: Apr 21, 2020, 09:11 PM IST
राज्यात गेल्या २४ तासांत ५५२ नवे कोरोना रुग्ण title=
संग्रहित फोटो

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरस रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्या 24 तासात राज्यात 552 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज राज्यात 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5218वर पोहचली आहे. 

आज 150 रुग्ण बरे झाले. तर संपूर्ण राज्यात एकूण 722 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत राज्यात 251 जणांचा मृत्यू झाला आहे.

एकट्या मुंबईत 3451 कोरोनाबाधित असून 151 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपात 150 कोरोनाबाधित असून 4 जण दगावले आहेत. तर ठाण्यात 22 जण बाधित असून 2 जण दगावले आहेत. नवी मुंबईत 94 जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. 

कल्याण-डोंबिवली मनपात 93 जण कोरोनाग्रस्त आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर उल्हासनगरमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

मीरा-भाईंदर मनपात 81 जण कोरोनाबाधित असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पालघरमध्ये 18 जणांना कोरोनाची लागण झाली असून एक जण दगावला आहे. 

वसई-विरार मनपात 111 रुग्ण असून 3 जणंचा बळी गेला आहे. पनवेल मनपात 34 कोरोनाबाधित असून एकाचा मृत्यू झाला आहे.

मालेगावात बाधितांचा आकडा सतत वाढत असून आतापर्यंत 85 रुग्ण आढळले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अहमदनगर 21 आणि अहमदनगर मनपात 8 कोरोनाबाधित असून दोन जण दगावले आहेत. धुळे, धुळे मनपात प्रत्येकी 2 रुग्ण असून एकाचा बळी गेला आहे. 

पुण्यात 19 जण बाधित असून एकाचा मृत्यू, तर पुणे मनपात 646 कोरोना रुग्ण असून 52 जण दगावले आहेत. पिंपरी-चिंचवड मनपात 51 कोरोनाग्रस्त असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर मनपा 25, सातारा 13, कोल्हापूर 6, कोल्हापूर मनपा 3, सांगली 26, सिंधुदुर्ग 1, रत्नागिरी 8, औरंगाबाद 1, औरंगाबाद मनपा 34, जालना 1, हिंगोली 1, लातूर 8, उस्मानाबाद 3, बीड 1, अकोला 7, अकोला मनपा 9, अमरावती मनपा 6, यवतमाळ 16, बुलढाण्यात 21, वाशिममध्ये 1, नागपूर 3, नागपूर मनपा 76, गोंदिया 1, चंद्रपूर मनपात 2 रुग्ण आढळले आहेत.