मुंबई : कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे. कोरोनाच्या संकटावर मात कशी करायची आणि कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुढील कालावधीत लॉकडाऊन ठेवायचे की नाही, याबाबतही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
BreakingNews । राज्यातील कोरोनाच्या परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री बैठक सुरु । बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये ही बैठक सुरु । बैठकीला जयंत पाटील, संजय राऊत, राज्याचे सचिव अजोय मेहता उपस्थित
#Covid19 https://t.co/zUoGCpjMvJ— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 23, 2020
राज्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाची साखळी वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनी कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेच धोरण कारणीभूत असल्याचे आरोप केला आहे. दरम्यान, कोरोनावरुन विरोधकांकडून राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाची स्थिती दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे. कोरोनाच्या संकटावर मात कशी करायची आणि कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पुढील कालावधीत लॉकडाऊन ठेवायचे की नाही, याबाबतही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालल्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ते काय मार्गदर्शन करतात, याचीही उत्सुकता आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि पवार यांच्या बैठकीला मंत्री जयंत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत, राज्याचे सचिव अजोय मेहताही बैठकीला उपस्थित आहेत. राज्यातील कोरोनाच्या परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. ही बैठक बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये सुरु आहे.