ट्रेनमध्ये घोरणाऱ्याला 'न झोपण्याची' शिक्षा

मुंबईकर आणि मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांचं ट्रेनशी वेगळच नातं आहे. या ट्रेनच्या प्रवासात दररोज वेगवेगळे 'नमुने'दिसतात. अशाच एका 'नमुन्या'ला सहप्रवाशांनी चांगलीच अद्दल घडवली.

Updated: Feb 13, 2018, 05:47 PM IST
ट्रेनमध्ये घोरणाऱ्याला 'न झोपण्याची' शिक्षा  title=

मुंबई : मुंबईकर आणि मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांचं ट्रेनशी वेगळच नातं आहे. या ट्रेनच्या प्रवासात दररोज वेगवेगळे 'नमुने'दिसतात. अशाच एका 'नमुन्या'ला सहप्रवाशांनी चांगलीच अद्दल घडवली.

सहप्रवासी हैराण 

टिळक टर्मिनसमधून एलटीटी-दरभंगा एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांना काल वेगळा अनुभव आला.

एक्सप्रेसमधील एका डब्ब्यात एक प्रवाशी ट्रेनमध्ये जोरजोरात घोरू लागला. यामूळे सहप्रवाशी चांगलेच हैराण झाले होते.

वारंवार समज देऊनही त्याचे घोरणे काही कमी झाले नव्हते. रामचंद्र असे या प्रवाशाचे नाव आहे. घोरण्यावरून रामचंद्रन आणि प्रवाशांमध्ये खटके उडाले.

न झोपण्याची शिक्षा

हा वाद मिटविण्यासाठी अखेर टी.सी. ना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर मात्र रामचंद्र चांगलाच 'भानावर' आला.

'आता मी झोपणारच नाही म्हणजे घोरण्याचा प्रश्नच येत नाही,' असे त्याने टी.सीला सांगितले.

त्यापुढच्या संपूर्ण प्रवासात तो जागाच राहिला. घोरणाऱ्या रामचंद्रला 'न झोपण्याची' चांगलीच शिक्षा मिळाली.