मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा...

Updated: Dec 1, 2019, 02:35 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला title=

मुंबई : गेल्या 5 वर्षात सत्तेत राहून मी दगा दिला नाही. २५ वर्षांपासून मित्र असणारा भाजप पक्ष आता विरोधक झालाय तर विरोधक आता मित्र झालेत.मी या पदावर राहून ही गोरगरिबांना न्याय देऊ शकलो नाही तर मला या पदावर राहण्याचा अधकार नाही. दिलेला शब्द पाळणं हे देखील माझं हिंदुत्व आहे. अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तनमनधन एकत्र करुन, मग रात्रीचं जरी जागावं लागलं तरी करु. विरोधक आणि सत्तेत असं न राहता दोघं मिळून एकत्र मिळून काम करु. देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला विरोधीपक्ष नेता म्हणणार नाही. तर एका जबाबदार पक्षाचा नेता म्हणून अभिनंदन करत आहे.

विधानसभेत येईन असं कधी बोललो नव्हतो पण नशिबानं इथं आलो. कानात काय बोललो आणि बंद दाराआड काय बोललो याची आमची संस्कृती नाही. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोले लगावले.

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदावर निवड झाली. भाजपची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाची हिवाळी अधिवेशनात होणार होती. त्यामुळे आजच्या कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्षनेतेपद निवडीचा उल्लेख नव्हता. मात्र भाजपनं विधानसभा अध्यक्षाची निवडणूक बिनविरोध करण्यास भाजपनं साथ दिली. त्याबदल्यात विरोधी पक्षनेतेपदाची नेमणूक करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

>