मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात जर एखादा मुख्यमंत्री एखाद्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतो तर तो त्या प्रकल्पाच्या उद्घाटनापर्यंत टिकू शकेलच असं नाही अशी सध्या राजकीय परिस्थिती आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
विक्रोळीत सुश्रूषा हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्रात सध्या विविध प्रश्नांवरून सत्ताधारी मित्रपक्ष आणि विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांचे हे विधान बरंचकाही सांगून जाणारा आहे.
पन्नास वर्षांची परंपरा असलेल्या सुश्रुषा रुग्णालयाच्या विक्रोळी येथील नवीन इमारतीचा उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं.