मुंबई : विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर ठाकरे सरकार आता कामाला लागले आहे. सोमवारी मंत्रालयात आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाज सुरू केले आणि मागील सहा महिन्यांच्या निर्णयाच्या फाईली मागवल्यात. देवेंद्र फडणवीस सरकारने शेवटच्या सहा महिन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयांच्या फाईली उद्धव ठाकरेंनी मागवल्या आहेत. विविध योजना, निविदा प्रक्रिया, लहान, मोठे निर्णय याबाबतच्या फाईली देण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या सर्व प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याबरोबरच, सर्व निर्णयांचाही उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपुरात सुरु करण्यात आलेले मुख्यमंत्री कार्यालय आता बंद करण्यात आले आहे. विदर्भातल्या लोकांना प्रत्येक कामासाठी मुंबईत जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे विदर्भाचे सक्षमीकरणं करण्याच्या दृष्टीने नागपुरात हैदराबाद हाऊसमध्ये मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्यात आले होते. मात्र आता नागपुरातील मुख्यमंत्रीकार्यलय बंद झाल्याने विदर्भातील जनता नाराज आहे. वैद्यकिय सहायता निधीसह इतर कामांसाठी विदर्भातील लोकांना थेट मुंबईला जावून अर्ज करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील सहा महिन्यांच्या निर्णयाच्या फाईल्स मागवल्या असून देवेंद्र फडणवीस सरकारने शेवटच्या सहा महिन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयांच्या फाईल्स पाहून काय झाले यांची माहिती घेणार आहेत. विविध योजना, निविदा प्रक्रिया, लहान, मोठे निर्णय याबाबतच्या फाईल्स देण्याचे सर्व विभागांना आदेश आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या सर्व प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याबरोबरच सर्व निर्णयांचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत.
काल, आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी फेटाळून लावल्या होत्या. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करत ४ ऑक्टोबरला रात्रीपासून झाडे तोडायला सुरुवात झाली होती. हे वृत्त समजल्यानंतर अनेक आंदोलक आरेमध्ये येऊन धडकले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. यापैकी २९ आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते.