मोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?

राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.  

Updated: May 26, 2020, 09:57 AM IST
मोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता? title=

कृष्णात पाटील / मुंबई : राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे. राज्यातील कोरोनाचा संकटाचा सामना करण्याबाबत राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवण्याची शक्यता असल्याने तसेच केंद्र सरकारने काही पावले उचलल्यास रणनिती आखण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीचे अधिक महत्व वाढल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यापाल  भगतसिंग कोश्यारी यांच्या  भेटीनंतर मातोश्रीवर दाखल झालेत.  काल संध्याकाळी मातोश्रीवर शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्याच बैठक झाल्याची माहिती पुढे येत आहे.  राज्यातील कोरोनाची भीषण स्थितीचे कारण पुढे करत केंद्र सरकारने काही पाऊल उचलल्यास त्यासंदर्भात रणनिती आखण्याविषयी बैठकीत  चर्चा  झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी आणि राज्य सरकारमधील वाद अनेकवेळा उघड झाला आहे. तसेच राज्यपाल समांतर सत्ता चालवत असल्याचाही आरोपही करण्यात आला आहे. तसेच ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचनाही करत आहेत. दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा आढवा घेण्यासाठी बैठकही बोलावली होती. 

नारायण राणे यांची राज्यपालांकडे मोठी मागणी

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यां नीही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री यांनी सचिवाना पाठवून या बैठकीला जाण्याचे टाळले होते. दरम्यान, राज्यपालांची वाढती नकारात्मक भूमिका पाहता केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट राजवट आणण्याची शक्यता आहे, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्यामुळे पवार आणि ठाकरे बैठकीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.