PM मोदी तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ घेऊन गेले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक विधान

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हटले की, या सर्व घडामोडींवर शरद पवार साहेब लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ यांना घेऊन गेले. 

Updated: Jun 22, 2022, 12:33 PM IST
PM मोदी तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ घेऊन गेले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक विधान title=

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हटले की, या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ यांना घेऊन गेले. 

'शिवसेनेची अस्वस्थता त्यांच्या बंडखोर आमदारांनी बोलून दाखवली आहे. याआधी आमच्या कानावर असं काही आलं नव्हतं? तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकार पडणं, राजिनामा देणं वेगैरे आम्हाला नवीन नाही. राष्ट्रवादी कधीही निवडणुकांसाठी तयार आहे'. असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे, 

संजय राऊत यांचे सूचक ट्वीट

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक ट्वीट केले आहे. या ट्विटची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संजय राऊत यांचे विधानसभा बरखास्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे बंड महाविकास आघाडी सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

 संजय राऊत यांनी ट्वीटरवरून बरखास्तीचे संकेत देताना म्हटले आहे, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने आहे.