बिल्डरच्या फायद्यासाठी रस्ता रद्द, पालिकेचा प्रताप

Updated: Aug 2, 2018, 09:03 PM IST

मुंबई : रस्त्याच्या मागणीसाठी याआधी अनेकवेळा आंदोलनं पाहीली असतील. पण चेंबूरमध्ये चक्क मान्य असलेला रस्ताच रद्द करण्याचा प्रताप नगरसेवक आणि मनपाने केलाय. कुकरेजा बिल्डरला नवी इमारत बांधण्यासाठी चक्क रस्ता रद्द करण्यात आलाय. यामुळे बिल्डरला चक्क २० कोटींचा फायदा होणार आहे. आरसी मार्ग ते सिंधी कॉलनी यांना जोडणारा हा रस्ता होता. लोकांना रस्त्याची गरज असताना लोकप्रतिनिधींना रस्ता का नको असा सवाल संतापलेल्या नागरिकांनी विचारलाय.

स्थानिकांची जीवघेणी कसरत 

 खासदार, राहुल शेवाळे यांनी रस्ता रद्द करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येतोय. शिवसेना आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींनी रस्ता रद्द करण्यासाठी पत्र दिलंय. रस्ता बंद झाल्याने स्थानिकांना नाल्यावर जीवघेणी कसरत करत प्रवास करावा लागतोय. नाल्याशेजारी जागा न सोडता बिल्डरने संरक्षक भिंत बांधलीय. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतायत.