छगन भुजबळ, रमेश कदमांची सुटका होणार?

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत तुरूंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 24, 2017, 02:14 PM IST
छगन भुजबळ, रमेश कदमांची सुटका होणार? title=

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत तुरूंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.

कलम ४५ हे घटनाबाह्य 

कारण या कायद्याचं कलम ४५ हे घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. तसंच कलम ४५ च्या शर्तींनुसार ज्या आरोपींना जामीन नाकारण्यात आला होता ते आदेशही सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेत. त्यामुळं अशा आरोपींना जामीन मिळण्याची चिन्ह आहेत. 

छगन भुजबळ आणि रमेश कदम सुटणार?

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम यांची यामुळे सुटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.