Central Railway Megha Block : रविवारी म्हणजे येत्या 26 नोव्हेंबरला जर तुम्ही मध्य किंवा हार्बर रेल्वेने प्रवास करणार असाल तर मेगाब्लॉकचं (Megablock) वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं नियोजन केलं. मुंबईकरांसाठी मध्यरेल्वेने (Central Railway) मेगाब्लॉकचं वेळापत्रक जारी केलं आहे. रविवारी म्हणजे 26 नोव्हेंबराल सकाळी 10.14 ते दुपारी 3.09 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई इथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. यापुढे ठाणे स्थानकावर योग्य धिम्या मार्गावर वळवण्यात येईल.
सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 या वेळेत कल्याण इथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येऊन ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकात थांबतील. पुढे माटुंगा इथं अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. धीम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सकाळी 9.53 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 3.18 वाजता सुटेल. तर अप धिम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण इथून सकाळी 9.55 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी 3.24 वाजता सुटेल.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत असेल. या दरम्यान, बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित होणार नाही. नेरुळ, बेलापूर-खारकोपर बंदर मार्ग वगळून हा मेगाब्लॉक असेल. सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेल इथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथं जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूर इथं जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल इथून सुटणारी ठाणे येथे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत बंद राहतील. डाऊन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी पहिली लोकल दुपारी 3.16 वाजता असेल आणि पनवेल येथे 4.36 वाजता पोहोचेल.
अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी शेवटची लोकल सकाळी 10.17 वाजता पनवेल येथून सुटून सकाळी 11.36 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी पनवेल येथून सुटणारी पहिली लोकल दुपारी 4.10 वाजता असेल आणि दुपारी 5.30 वाजता पनवेल येथे पोहोचेल.
डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेल दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी 9.39 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी 10.31 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेल दिशेने जाणारी पहिली लोकल दुपारी 4.00 वाजता असेल आणि पनवेल येथे दुपारी 4.52 वाजता पोहोचेल.
अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाण्याच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.41 वाजता सुटून ठाणे येथे सकाळी 11.33 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाणे दिशेने जाणारी पहिली लोकल 4.26 वाजता असेल आणि ठाणे येथे संध्याकाळी 5.20 वाजता पोहोचेल.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.