मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी स्फोटक ट्विट केलं आहे. या ट्विटद्वारे शिवसेनेला (Shivsena) गंभीर इशारा दिला आहे. मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचं राणेंनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांना लवकरच खास बातमी मिळेल, असा इशारा नारायण राणे यांनी ट्विटद्वारे दिला आहे. (cabinet minister and bjp leader narayan rane hint for shivsena about ed notice via tweet)
सुशांत सिंह आणि दिशा सालियान प्रकरणी चौकशी
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अभिनेत्री दिशा सालियन यांचाही उल्लेख केला आहे. या दोघांनी आत्महच्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच दिशा सालियनचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे", असा गंभीर आरोपही राणेंनी या ट्विटमधून केला आहे. या दोघांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचा इशाराही राणेंनी दिला.
विनायक राऊत आपण कुठे धावणार?
राणेंनी या ट्विटमधून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही प्रश्न विचारला आहे. "विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी आहे. मातोश्रीवर ईडीची नोटीस आल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार", असा सवाल राणेंनी या ट्विटमधून विनायक राऊतांना केला.
शनिवारी गौप्यस्फोट
दरम्यान या प्रकरणी उद्या शनिवारी आणखी गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी झी 24 तासला दिली. नारायण राणे हे दिल्लीहून मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत.
विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ?
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 18, 2022