मुंबई : मुंबईतील अत्यंत जुनी आणि जागतिक दर्जा असलेल्या एशियाटीक लायब्ररीचं नुतनीकरण फारसं चांगलं झालेलं नाही. त्यातच काही दिवसांपूर्वीच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जून्या आणि दुर्मिळ पुस्तकांचं नुकसान झालंय.
आता ही भिजलेली पुस्तकं वाळवण्याचं काम केलं जातं आहे. या लायब्ररीतील नुकसान झालेल्या पुस्तकांचा आणि ग्रंथांचा आढावा घेतला असता कुचकामी कामाचा फटका या दुर्मिळ पुस्तकांना बसल्याचंच दिसून येतंय.