मुंबई : बाळाच्या जन्मानंतर आईवडिलांना होणाऱ्या आनंदाला सीमा नसतात. इथल्या एका दाम्पत्याला 'चौपट आनंद' झाला आहे. जे. जे. रुग्णालयात एका महिलेने एकाचवेळी एक, दोन नव्हे तर चार बाळांना जन्म दिला आहे. जहानरा शेख या २९ वर्षाच्या महिलेचे नाव आहे. जहानरा नाशिकची असून गेल्या पाच महिन्यांपासून उपचारासाठी जे. जे. मध्ये येत होती.
जहानरा शेखने ७ऑगस्टला एक मुलगा व तीन मुलींना जन्म दिला. ती नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर उपचार घेत होती. डॉक्टरांनी जहानराची तपासणी व उपचार केले असून बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याचे सांगितले आहे. त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे . एकाचवेळी चार मुलांना जन्म देण्याची मुंबईतील गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जहानरा हिनेडॉ. प्रीती लेव्हीस, डॉ. निधी व डॉ. शर्वरी यांच्याकडून तिच्यावर उपचार सुरू होते.
जन्मावेळी मुलाचे वजन
१.८५ कि.ग्रॅ
तीन मुलींचे वजन अनुक्रमे
९५० कि.ग्रॅ
१.२ कि.ग्रॅ
१.४ कि.ग्रॅ
रविवारी घरी सोडताना या ‘चौळ्यां’चे वजन अनुक्रमे
२.० कि.ग्रॅ
१.९ कि.ग्रॅ
१.८ कि.ग्रॅ
१.८ कि.ग्रॅ