BMC Job: मुंबई पालिकेत भरती, चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची शेवटची संधी

BMC Job 2023 : मुंबई पालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 7, 2023, 06:13 PM IST
BMC Job: मुंबई पालिकेत भरती, चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची शेवटची संधी  title=

BMC Job 2023 : मुंबई पालिकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई महापालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

मुंबई पालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे.  62 वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. 

उमेदवारांनी आपले अर्ज उमेदवार वैद्यकीय अधिक्षक, कस्तुरबा रुग्णालय यांचे प्रशासकीय कार्यालय या पत्त्यावर पाठवायचे आहेत.7 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत वेबसाइट portal.mcgm.gov.in वर यासंदर्भात सविस्तर तपशील देण्यात आला आहे. शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Railway Job: मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

महावितरणमध्ये विविध पदांची भरती 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये वीजतंत्रीची 13 पदे, तारतंत्रीची 13 पदे, कोपाची 8 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.apprenticeshipindia.gov.inवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर त्याची प्रत आणि नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे नागपूर महावितरणच्या दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. यावेळी तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.  येताना कागदपत्रांची झेरोक्ससोबत घेऊन येणे आवश्यक आहे. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास नोकरी नाकारण्याचा अधिकार संस्थेकडे राहिल याची उमेदवारांनी नोंद घ्या. उमेदवारांनी अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. महावितरणच्या विविध पदांसाठी  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही. तसेच उमेदवारांना महावितरणच्या नियमानुसार पगार दिला जाईल, याची नोंद घ्या.उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  9 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.