गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक (Bmc Election 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे भाजप (Bjp) आणि शिंदे गटाने (Eknath Shinde Group) एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. मात्र याच भाजपला आता शिंदे गटाकडून खिंडार पाडण्यासाठी सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे (Praksh Surve) यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्याने पत्नीसोबत शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. (bjp north india mahamantri ram yadav and his wife join eknath shinde group in presence mla prakash surve)
भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनी भाजपला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार याच्या उपस्थित पक्षप्रवेश करण्यात आला आहे. या यादव दामपत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपला धक्का बसला आहे. रेखा यादव या भाजपच्या झोपडपट्टी सेलच्या सदस्य आहेत.