डिसेंबर महिन्यातील हे 5 दिवस अत्यंत अशुभ, चुकूनही करू नका 'ही' काम, अन्यथा...

नवीन वर्षाच्या आगमानापूर्वी या वर्षातील अखेरच्या डिसेंबर महिन्यातील 5 दिवस अतिशय अशुभ असणार आहे. या 5 दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. असं का जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Dec 3, 2024, 08:49 PM IST
डिसेंबर महिन्यातील हे 5 दिवस अत्यंत अशुभ, चुकूनही करू नका 'ही' काम, अन्यथा... title=

डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे. हा महिना संपल्यावर नवीन वर्षाचं आगमन होणार. पूर्वी वर्षाच्या सुरुवात होण्यापूर्वी डिसेंबर महिन्यातील 5 दिवस अत्यंत अशुभ असणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या पाच दिवसांमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. या पाच दिवसांना ज्योतिषशास्त्रानुसार पंचक असं म्हटलं जातं. हा पंचक काळ कधी सुरु होतोय आणि कधी संपणार आहे जाणून घ्या. 

'या' तारखेपासून पंचक सुरु होणार!

येत्या शनिवारी 7 डिसेंबर 2024 ला पहाटे 5.07 पासून मृत्यू पंचक सुरु होणार आहे. मृत्यू पंचक हे 11 डिसेंबर 2024 सकाळी 11:48 वाजता संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जे पंचक शनिवारपासून सुरु होतं त्याला मृत्यू पंचक असं म्हटलं जातं. 

ज्योतिषशास्त्रानुसार मृत्यू पंचक हे सर्वात धोकादायक आणि अशुभ मानलं गेलंय. या पंचकांमध्ये चुकूनही काही गोष्टी करु नयेत, अन्यथा तुम्हाला मृत्यूसारख्या वेदना होतात. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, मृत्यूपंचकादरम्यान वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे मानवाला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास होतो. 

मृत्यू पंचकादरम्यान चुकूनही या गोष्टी करू नका!

मृत्यू पंचकादरम्यान कोणतेही जोखमीचे काम करू नये. या अशुभ कालावधीच्या चपळाईत आल्यास अपघात, दुखापत, वाद आणि कायदेशीर अडचणीत येण्याचा धोका आहे.  

पंचक काळात व्यक्तीने चुकूनही घराचे छत बसवू नये. यामुळे घरात नकारात्मकता येते. 

पंचक दरम्यान लोखंड किंवा लाकूड गोळा करू नये. याचा अशुभ परिणाम होतो आणि देव रागावतो, अशी मान्यता आहे. 

पंचकच्या दिवसात दक्षिण दिशेला प्रवास करू नये. कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे पंचकच्या दिवसात चुकूनही दक्षिण दिशेला जाऊ नये.

पंचक दिवसात नवीन वस्तू खरेदी करू नये, नकारात्मक प्रभाव वाढतो.

कोणत्याही मुलीने तिच्या घरी किंवा सासरच्या घरी जाऊ नये.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)