भाजप आमदार आशिष शेलार यांचा धमकी, गृहमंत्र्यांना लिहिले पत्र

BJP MLA Ashish Shelar's threat : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना मोबाईलवरुन धमकी देण्यात आली आहे. ( threat call)  

Updated: Jan 8, 2022, 01:03 PM IST
भाजप आमदार आशिष शेलार यांचा धमकी, गृहमंत्र्यांना लिहिले पत्र title=
संग्रहित छाया

मुंबई : BJP MLA Ashish Shelar's threat : भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना मोबाईलवरुन धमकी देण्यात आली आहे. ( threat call) याबाबत आशिष शेलार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडेच थेट तक्रार केली आहे. (BJP MLA Ashish Shelar will be threatened with death, will write a letter to Home Minister)

दरम्यान,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धमकीनंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आशिष शेलार सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आहेते. सरकारचा भ्रष्टाचार, सरकारमधला अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणत आहेत. ते संघर्ष करत आहेत. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल.. पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.  

 गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील यांना दिलेल्या तक्रार निवेदनात आशिष शेलार यांनी नमुद केले आहे की, मागील काही दिवसांपासून मला माझ्या मोबाईल नंबरवर दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून सतत जीवे ठार मारण्याच्या धमकीचे फोन करण्यात येत आहेत. या दोनही मोबाईल नंबर वरुन करण्यात आलेल्या फोनवरुन मला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असून जीवे मारण्याची धमकी देखील मला दिली आहे. ज्या भाषेत आणि ज्या त्वेषाने समोरच्या व्यक्ती बोलत होते त्यावरुन हे प्रकरण मला अत्यंत गंभीर वाटते आहे.

सतत लोकप्रतिनिधींना धमक्या येण्याचे प्रमाण वाढत असल्याने ही बाब अधिक गंभीरतेने घेणे आवश्यक आहे, असे सांगत आशिष शेलार यांनी म्हलटे आहे की, 
धमकीचा कॉल आला म्हणून मी तातडीने काल पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. तसेच या पत्रात ते दोन मोबाईल नंबरची सविस्तर माहिती तपासासाठी पोलीसांना दिली आहे. माझ्या कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी ज्या पध्दतीने देण्यात आल्या आहेत, ही बाब गंभीर आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे.  या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आपण त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी  आशिष शेलार यांनी केली आहे.