मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, दिवाळीआधीच महापालिकेकडून मिळणार गिफ्ट

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईकरांसाठी केली मोठी घोषणा

Updated: Feb 27, 2023, 04:15 PM IST
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, दिवाळीआधीच महापालिकेकडून मिळणार गिफ्ट title=

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbaikar) एक मोठी खुशखबर आहे. दिवाळीआधी मुंबईकरांना कोस्टल रोडवरुन (Coastal Road) प्रवास करता येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून कोस्टल रोड सुरू होणार असल्याची घोषणा महापालिका (Mumbai Corporation) आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी केलीय. मुंबईतली वाहतूक कोंडी (Traffic) दूर होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. त्यासोबत या प्रकल्पातल्या दोन मोठ्या बोगद्यांचंही उद्धाटन 15 मार्चला होणार आहे. मरिन ड्राईव्ह ते प्रियदर्शन पार्क (Marine Drive to Priyadarshini Park) दरम्यानच्या पहिल्या बोगद्याचं काम झालं असून दुसरा बोगदाही 15 मार्चआधी तयार होणार आहे. 

कोस्टल रोड आठ पदरी आहे तर बोगद्यातला मार्ग सहा पदरी असेल. तसंच 1 हजार 856 गाड्यांसाठी भूमिगत पार्किंगचंही (Underground Parking) नियोजन करण्यात आलंय.. वरळी दूध डेअरी, टाटा गार्डन, हाजीअली आणि सी लिंकजवळ हे पार्किंग असेल. कोस्टल रोडच नाही तर मुंबईकरांसाठी आणखीही मोठे प्रकल्प महापालिका राबवतेय, 

मुंबईकरांसाठी आणखी काय मिळणार? 
दिवाळीआधी कोस्टल रोडवरुन प्रवास करता येणार
मुंबईच्या सुशोभीकरणासाठी 500 कामांचा शुभारंभ
वाहतूक बेट, रस्ते दुभाजक, फुटपाथ, सुशोभित भिंती, गार्डन, पूलांचं काम
111 रस्त्यांचं सीमेंट काँक्रिटीकरण, पावसाळ्याआधी काम पूर्ण करणार
महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन
ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर 20 ठिकाणी फिरती स्वच्छतागृहं

मुंबईकरांसाठी बेस्टचंही योगदान
दरम्यान, बेस्ट (BEST) उपक्रमाने 'बेस्ट चलो स्मार्टकार्ड'च्या (Chalo Smartcard) माध्यमातून डिजिटल पद्धतीने प्रवासभाडे प्रदान करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिलीय. या पर्यायाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना बेस्टच्या बसमध्ये सर्वप्रथम प्रवेश देण्यात येणारंय. ही सुविधा 1 मार्चपासून उपलब्ध होणार आहे.

डोंबिवली-ठाणे प्रवास 20 मिनिटात
डोंबिवली ते ठाणे (Dombivali to Thane) प्रवास अवघ्या 20 मिनिटांत शक्य होणार आहे. एमएमआरडीएने माणकोली मोठागाव जोडरस्ता भुयारी मार्ग आणि उल्हास नदीवर खाडीपूल बांधला जातोय. भुयारी मार्गामुळे ठाण्याहून डोंबिवलीला जाण्यासाठी दोन ते तीन किमीचा वळसा वाचणार आहे..