VIRAL VIDEO: इशा पिरामल यांच्या घरी जमली अख्खी अंबानी फॅमिली, राधिका मर्चंटच्या...

Radhika Merchant Viral Photo: मुकेश अंबानी (Mumbai Isha Ambani house Video) यांची फॅमिली (Ambani) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इशा अंबानी पिरामल यांच्या घरी ग्रँण्ड पार्टी अख्ख अंबानी कुटुंब अवतरलं होतं. यावेळी अंबानी कुटुंबाचा देसी लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तर होणारी सून राधिका मर्चंटच्या लूकने सर्वांच्या नजरा खिळल्या. (Mumbai Isha Ambani house Video)

Updated: Feb 27, 2023, 12:37 PM IST
 VIRAL VIDEO: इशा पिरामल यांच्या घरी जमली अख्खी अंबानी फॅमिली, राधिका मर्चंटच्या... title=
Isha Ambani Anand Piramal welcome party at mumbai ambani family arrived Radhika Merchant Rashmi Thackeray video viral on Social media

Radhika Merchant Viral Photos: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायंस कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा साखरपुडा मोठ्या थाट्यामाट्या पार पडला होता. या सोहळ्याचा अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या ग्रँड सोहळ्याला बॉलिवूडपासून क्रीडा विश्वातील अगदी राजकारणातील दिग्गज एका छताखाली जमले होते. त्यानंतर आता हे कुटुंब पुन्हा एकदा ग्रँड पार्टीसाठी लेकीच्या मुंबईतील (mumbai news) वरळीमधील घरी एकत्र आलं होतं. (Isha Ambani-Anand Piramal welcome party)

अंबानी कुटुंबियांचा देसी लूक!

लेक ईशा अंबानी हिच्या सासरी आनंद पिरामल (Isha Ambani-Anand Piramal) यांच्या घरी संपूर्ण अंबानी कुटुंब सेलिब्रेशनसाठी आलं होतं. यावेळी मुकेश अंबानी, नीता अंबानी (Nita Ambani), आकाश अंबानी (Akash Ambani), श्लोका अंबानी (Shloka Ambani) आणि छोटे अंबानी पृथ्वी (Prithvi Ambani) पारंपारिक वेशभूषेत दिसून आले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ambani Family (@ambani_update)

नीता अंबानी यांनी सुंदर नक्षीदार सिल्क साडी नेसली होती. तर मुकेश आकाश आणि छोट्या पृथ्वीने कुर्ता पायजमा घातला होता. मात्र स्टायलिश बहु श्लोका अंबानीने इंडो वस्टर्न म्हणजे स्कर्ट आणि ब्लाउज घातलं होतं. (Isha Ambani Anand Piramal welcome party at mumbai ambani family arrived Radhika Merchant Rashmi Thackeray video viral on Social media)

राधिकाच्या लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा 

यावेळी सगळ्यांचा नजरा खिळल्या त्या होणारी सूनबाई राधिका मर्चंट हिच्या लूकवर...नीलमणी हिरवा सिल्क लेहेंगामध्ये राधिका एका सुंदर परीसारखी दिसत होती. नंदनबाई ईशाकडील पार्टीसाठी राधिका खास मुंबईत आली होती. 

आजी कोकीलाबेन आल्या नातीकडे

नात ईशा अंबानी हिच्या सासरी कोकीलाबेन अंबानीही (Kokilaben Ambani) खास आल्या होत्या. आजी आली म्हणून खास आकाश अंबानी त्यांना खाली गाडीजवळ घ्यायला आला होता. त्यावेळी पापाराझींना त्यांनी फोटोसाठी पोझ दिली.

'या' खास पाहुण्याने वेधलं लक्ष

तसं तर अंबानी कुंटुंबातील सोहळा असला की बॉलिवूड, क्रीडा क्षेत्र असो की राजकारणी सगळेच हजेरी लावतात. पण ईशा अंबानीच्या घरच्या पार्टी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) पोहोचल्या होत्या. त्यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

ईशा दिसली जुळ्या मुलांसोबत

हा सोहळा रविवारी संध्याकाळी रंगला. पण सकाळी ईशा अंबानी त्याचा दोन जुळ्या मुलांसह आडिया आणि कृष्णासोबत वरळीच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती पापाराझींच्या कॅमेऱ्याक कैद झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

भव्य काचेचं घर

ईशा अंबानीने डिसेंबर 2018 मध्ये आनंद पिरामलशी लग्न केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या जोडप्याना जुळी मुलं झाली.  ईशा अंबानी - आनंद पिरामल यांच्या घराबद्दल (isha ambani house) बोलायचं झालं तर... हे घर कोणत्याही कोट्यधीशांच्या घरासारखं आहे. या घराला तीन तळघर आहेत, त्यापैकी दोन तळघरांचा वापर हा पार्किंगसाठी केला जातो. आलिशान घरामध्ये लॉन, स्विमिंग पूल आणि दुहेरी उंचीच्या बहुउद्देशीय खोल्या आहेत. या घराचं वैशिष्ट म्हणजे 3D मॉडेलिंग डिझाइनसह बनविलेले एक भव्य काचेचे दर्शनी भाग...जे वरळीवरुन जाणाऱ्या प्रत्येकांना आकर्षित करतं.