'बिग बॉस 12'मध्ये सलमानची जागा अक्षय घेणार?

'बिग बॉस 12'मध्ये सलमान खानऐवजी अक्षय कुमार येणार असल्याची शक्यता आहे. 

Updated: Jul 20, 2017, 06:10 PM IST
'बिग बॉस 12'मध्ये सलमानची जागा अक्षय  घेणार? title=

मुंबई : 'बिग बॉस 12'मध्ये सलमान खानऐवजी अक्षय कुमार येणार असल्याची शक्यता आहे. आपल्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी अनेकदा बिग बॉसमध्ये आलेला खिलाडी अक्षय कुमार या शोमध्ये होस्ट म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी देखील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता की, सलमान खान याच वर्षी ’10 का दम’मध्ये होस्टची भूमिका बजावेल. पण आता आलेल्या बातमीनुसार सलमान अकराव्या पर्वानंतर बिग बॉस आणि कलर्सला अलविदा करु शकतो.

मोस्ट अवेटेड रियालिटी शो ‘बिग बॉस’चं अकरावं पर्व लवकरच सुरु होणार आहे. यासाठी स्पर्धकांची निवडही सध्या सुरु आहे. दहाव्या पर्वाप्रमाणेच अकराव्या पर्वात देखील सलमान खान हाच बिग बॉसमध्ये होस्ट असणार आहे. पण काही मीडिया रिपोर्टनुसार, या अकराव्या पर्वानंतर सलमानचा कलर्स टीव्ही सोबतचा प्रवास थांबू शकतो.

 मीडियाच्या वृत्तानुसार, असा दावा करण्यात आला आहे की, सलमान खान सोनी टीव्हीवरील शो ’10 का दम’च्या तिसऱ्या पर्वात होस्ट असू शकतो. तसंच यामध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, कलर्स टीव्हीकडून आतापासूनच 12व्या पर्वासाठी होस्टचा शोध सुरु झाला आहे.