भांडूप पोटनिवडणूक : शिवसेना की भाजप बाजी मारणार?

मुंबई महापालिकेच्या भांडूपमधील प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. बुधवारी या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं.  

Updated: Oct 12, 2017, 09:42 AM IST
भांडूप पोटनिवडणूक : शिवसेना की भाजप बाजी मारणार? title=

मुंबई : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. बुधवारी या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं. मतदानाला इथल्या मतदारांचा थंड प्रतिसाद लाभला. काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. 

शिवसेनेतून आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपातून प्रमिला पाटील यांच्या सून जागृती पाटील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. प्रचाराच्या काळात दोन्ही पक्षाचे बडे नेते या मतदारसंघात तळ ठोकून होते. 

यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामा-याही झाल्या. त्याच पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदानानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्याच उमेदवाराच्या विजयाचा दावा केलाय. आता कोणाचा दावा खरा ठरतोय ते निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.