आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्टकडून भाडेवाढ

बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्ट बस सुधारणांच्या आराखड्याला मुंबई महापालिका सभागृहानं अंतिम मंजूरी दिली आहे. 

Updated: Mar 4, 2018, 08:37 AM IST
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्टकडून भाडेवाढ title=

मुंबई : बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेस्ट बस सुधारणांच्या आराखड्याला मुंबई महापालिका सभागृहानं अंतिम मंजूरी दिली आहे. 

यात बेस्ट बस भाडेवाड, बेस्ट बस संख्येत कपात आणि बेस्ट कर्मचा-यांचे भत्ते कपात अशा अनेक महत्वाच्या बदलांचा समावेश आहे. 

यापैकी अनेक बदलांना महापालिकेतील विरोधी पक्ष आणि बेस्ट कर्मचारी संघाटनांनी विरोध केलाय. तसेच हे बदल बेस्टला खाजगीकरणाकडे घेऊन जाणारे असल्याचेही आऱोप करण्यात आलेत.