पारा तापला; मुंबईकर घामेजले, उष्मा वाढणार

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मुंबई व परिसरात तापमान चढेच राहणार आहे. अर्थात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईतील तापमान काहीसे घटले आहे. शनिवारी ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर गेलेले कमाल तापमान काही प्रमाइणात कमी झाले होते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 4, 2018, 08:20 AM IST
पारा तापला; मुंबईकर घामेजले, उष्मा वाढणार title=

मुंबई : होळीच्या सणानंतर वातावरणात उष्णता वाढायला सुरूवात होते हे खरे. पण, यंदा नेहमीच्या तुलनेत काहीसा अधिकच उष्मा वाढला आहे. हवेतील आर्द्रताही तापमानावेक्षा बरीच वाढली आहे. याचा परिणाम मुंबईतील पाऱ्यावर झाला असून, मुंबईकरांच्या यंदाच्या उन्हाळ्याची सुरूवातच घामेघुम होत झाली. त्यामुळे सुरवातच अशी तर मध्यांतरानंतर काय असा प्रश्न मुंबईकरांना अस्वस्थ करत आहे.

दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मुंबई व परिसरात तापमान चढेच राहणार आहे. अर्थात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईतील तापमान काहीसे घटले आहे. शनिवारी ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर गेलेले कमाल तापमान काही प्रमाइणात कमी झाले होते.

मुंबईतील काही ठिकाणांचे तापमाण

सांताक्रूझ - कमाल तापमान ३३. ६ अंश सेल्सिअ
कुलाबा येथे ३२ अंश सेल्सिअस 

आर्द्रतेचे प्रमाण

कुलाबा येथे आर्द्रता ९३ टक्के 
सांताक्रूझ येथे आर्द्रता ९१ टक्के 

राज्यातील इतर भागात तापमान

अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा - कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस 
अमरावती, चंद्रपूर, नागपूर व यवतमाळमध्ये ३८ अंश सेल्सिअस
जळगाव, परभणीत ३९ अंश सेल्सिअस
मालेगाव, सोलापूर व नांदेडमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस 
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रायगड जिल्ह्यातील भीरा येथे ४१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ७ मार्च रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.