देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, शिवसेनेला चिमटे

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती.  फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेब यांना मानवंदना दिली. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) चिमटे काढले. 

Updated: Jan 23, 2021, 11:42 AM IST
देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, शिवसेनेला चिमटे   title=
संग्रहित छाया

मुंबई : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. (Balasaheb Thackeray Birth Anniversary) यानिमित्ताने भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेब यांना मानवंदना दिली. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) चिमटे काढले. फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांना अभिवादन करतानाच शिवसेनेला स्वाभिमानावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीमुळे भाजपकडे सर्वाधिक आमदार असूनही सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यामुळे शिवसेनेने भाजपला बाजुला सारत सत्ता स्थापन केली. या राजकीय खेळीमुळे शिवसेनेला भाजपची नाराजी ओढवून घ्यावी लागली. भाजपची ही नाराजी अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओ हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. 

बाळासाहेबांच्या नेतृत्वाचं, विचारांचं कौतुक करताना फडणवीसांचे शिवसेनेला टोमणे मारले आहे. व्हिडिओतून बाळासाहेबांचं चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्वाचं मूर्तिमंत प्रतीक असे वर्णन केले आहे. बाळासाहेबांच्या भाषणातील निवडक आणि सूचक वाक्य फडणवीसांनी शेअर केली आहेत.

आम्ही कुठेही असलो तरी बाळासाहेब ठाकरे आम्हाला आदरस्थानीच राहतील. त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करत राहणार. तुम्ही त्यांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली. बाळासाहेब हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होत, असे फडणीस यांनी म्हटले आहे.