प्रशांत अंकुशराव / मुंबई : बातमी आहे दुधाच्या भेसळीची. (adulterated milk) ज्याच्या घरी दूध (milk) वापरलं जात नाही, असं राज्यातही एकही घर नसेल. त्यामुळे दुधाला प्रचंड मागणी असते. हे हेरून शहरांत पुरवठा केल्या जाणाऱ्या पिशवीबंद दुधात (Bagged milk adulteration) मोठ्या प्रमाणात भेसळ केली जातेय. हे भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी हानीकारक आहे. ही भेसळ कशी होते? यावर पाहुयात, 'झी २४ तास'चे ऑपरेशन पुतना मावशी.
मुंबईत पिशवीबंद दुधात भेसळ, दुधाच्या भेसळीवर 'झी २४ तास'चं ऑपरेशन pic.twitter.com/szNBxltWri
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 6, 2021
तुम्ही दूध पित असाल तर सावधान. तुम्ही पीत असलेलं दूध तुमच्य़ासाठी विष ठरु शकतं. कारण मुंबईत भेसळयुक्त दुधाचा पुरवठा वाढलाय. दूध उत्पादक कंपन्या दर्जेदार दूध वितरीत करतात. पण पुरवठा साखळीत या दुधात भेसळ होते. अनेक विक्रेते दुधाच्या पिशव्या घेऊन त्यामध्ये बेमालूमपणे पाणी मिसळतात, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्ष अर्चना पाटील यांनी दिली.
भेसळीचं दूध विकण्यासाठी वापरलेल्या दुधाच्या पिशव्यांचा वापर होतो. त्यामुळं भंगारमध्ये पिशव्या विकताना त्या फाडून विकाव्यात असं आवाहन पोलिसांनी केले आहे. भेसळखोरांविरोधात अनेक कायदे करण्यात आलेत. पण भेसळीचं प्रमाण कमी होत नाही. त्यामुळं दूध विकत घेताना ते भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करुन घ्या.