कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची मुंबईत तोडफोड, हल्लेखोर पसार

कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Dec 1, 2017, 11:16 AM IST
कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची मुंबईत तोडफोड, हल्लेखोर पसार title=

मुंबई : कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. हा हल्ला कुणी केला याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाहीये.

हल्लेखोर पसार 

मुंबईत आधीच मनसे आणि कॉंग्रेस फेरीवाला प्रकरणावरून आमनेसामने आले असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलीस करत आहेत. 

‘मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला’

फेरीवाला आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राडेबाजीला सुरुवात झाली होती. विक्रोळी येथे काँग्रेस समर्थकांनी मनसे कार्यकर्त्यांना रविवारी रात्री जबर मारहाण केली होती. यावर ‘मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला असून, यापुढे त्यांनी गुंडगिरी सोडून द्यावी,’ अशा शब्दांत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या वादातून तर ही घटना घडली नाही ना असा प्रश्न विचारला जात आहे.