आता रक्ताच्या नात्यातील जात प्रमाणपत्र वैधतेसाठी पुरे

जात प्रणापत्रासाठी (कास्ट सर्टीफिकेट्स) शासकीय उंबरडे झिजवून सुद्धा ते तात्काळ हाती मिळेल की नाही याची शाश्वती नाही. मात्र, याला लगाम बसणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 1, 2017, 11:14 AM IST
आता रक्ताच्या नात्यातील जात प्रमाणपत्र वैधतेसाठी पुरे title=

मुंबई  : जात प्रणापत्रासाठी (कास्ट सर्टीफिकेट्स) शासकीय उंबरडे झिजवून सुद्धा ते तात्काळ हाती मिळेल की नाही याची शाश्वती नाही. मात्र, याला लगाम बसणार आहे. आता रक्ताच्या नात्यातील एकाचे जात प्रमाणपत्र वैधतेसाठी पुरे ठरणार असून एका महिन्याच्या आता जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.

एक महिन्याच्या आत देणे बंधनकारक

याबाबत सामाजिक न्याय विभागाने एक अधिसूचना जारी केली आहे. जात वैधता प्रमाणपत्र यापुढे एक महिन्याच्या आत देणे बंधनकारक असून त्याचबरोबर वडील किंवा वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांकडील जात वैधता प्रमाणपत्र हा एकमेव पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानुसार त्यांच्या पाल्यांना वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतूद संबंधित नियमांमध्ये करण्यात आली आहे. 

होणारा त्रास वाचणार

शासनाच्या या निर्णयामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा त्रास वाचणार आहे. रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्तिकडे असलेले जात  वैधता प्रमाणपत्र यासाठी पुरे ठरणार आहे. यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेय.

जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी. तसेच, नागरिकांना होणारा त्रास वाचावा यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

रक्तातील नात्यात  पुरावा वैध

रक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास दुसऱ्याला वैधतेसाठी नवीन पुरावे सादर करण्याची गरज अणार नाही. अर्जदाराने सादर केलेल्या कागद पत्रांसंदर्भात काही आक्षेप असल्यास  ६० दिवसांत त्याची पडताळणी करणे जात प्रमाणपत्र अधिकाऱ्याना बंधनकारक असेल. त्यामुळे कटकट दूर झाली आहे.