शिवसेनेला आणखी एक धक्का, पदाला काही अर्थ नाही म्हणत माजी मंत्र्याचा राजीनामा

'शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती'

Updated: Jul 18, 2022, 02:41 PM IST
शिवसेनेला आणखी एक धक्का, पदाला काही अर्थ नाही म्हणत माजी मंत्र्याचा राजीनामा title=

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)40 समर्थकांसह शिवसेनेतून बाहेर पडले आणि शिवसेनेला ((Shiv Sena) मोठा धक्का बसला. त्यानंतर शिंदे गटासोबत अनेक जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक आणि कार्यकर्तेही सामील झाले. आता शिवसेनेला पुन्हा एक मोठ धक्का बसला आहे. 

माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिलं असून त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर यापदाला कुठलीही किंमत राहिली नाही असं रामदास कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही, उलट मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेकवेळा अपमानित करण्यात आलं, असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. 

रामदास कदम यांचा मुलगा आणि आमदार योगेश कदम हे शिंदे गटात सामाल झाले आहेत. मुलांना जिथे जायचं आहे तिथ जाऊ दे मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच असणार आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं.  25 जूनला शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीतही रामदास कदम अनुपस्थित होते.

रामदास कदम यांची राजकीय कारकिर्द
रामदास कदम हे सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. 2009 मध्ये रामदास कदम यांचा पराभव झाला. 2010 मध्ये शिवसेनेने त्यांना विधानपरिषदेवर पाठवत मोठी संधी दिली. 2005 ते 2009 या काळात ते विरोधी पक्षनेते होते. 2014 मध्ये त्यांना युती सरकारमध्ये पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.