'खुर्ची गेल्याची तडफड होतेय. असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटायला लागलंय'

 या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध नाही एखाद्याचे करियर खराब करण्याचा प्रकार

Updated: Aug 4, 2020, 04:13 PM IST
'खुर्ची गेल्याची तडफड होतेय. असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटायला लागलंय' title=

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावर आता राजकारण सुरू झालं आहे. या प्रकरणावर ट्विट करताना अमृता फडणवीस यांनी मुंबई सुरक्षित नाही असं म्हणतं मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. असं असताना आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी मृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 

'खुर्ची गेल्याची तडफड होतेय. असं काय झालं की त्यांना असुरक्षित वाटायला लागलंय' असं म्हणत हातातून सत्ता गेल्यावर आता मुंबई असुरक्षित वाटत असल्याची टीका अनिल परब यांनी केली आहे. 

गेली ५ वर्षे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री होते. पोलिसांवर विश्वास नसेल, सुरक्षित वाटत नसेल तर त्यांनी राज्य सोडून जावे. हे केवळ राजकारण करण्यासाठी होत असल्याचं अनिल परब म्हणाले. 

सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी हा मुद्दा गेले काही दिवस जोर धरत आहे. यावर अनिल परब म्हणाले,' हे सगळं बिहार निवडणुकीसाठी चाललं आहे. आम्ही मुंबई पोलिसांच्या पाठिशी ठाम आहोत
. त्यामुळे मुंबई पोलिसच या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं अनिल परब म्हणाले. 

सुशांत प्रकरणात आतापर्यंत ५६ लोकांची चौकशी झाली. मात्र अद्याप करण जोहरची चौकशी झाली नाही. यामुळे या प्रकरणात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा साथ असल्याचा दावाही केला जात आहे. यावर अनिल परब म्हणाले की,' युवा नेत्यांचे नाव खराब करायचं, सीएमची इमेज खराब करण्याचे हे षडयंत्र आहे. या प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा संबंध नाही एखाद्याचे करियर खराब करण्याचा प्रकार आहे, असं यावेळी अनिल परब म्हणाले.