रामराजे शिंदे, नवी दिल्ली : अनिल देशमुख (Anil deshmukh) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते थेट दिल्लीला जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे. राजीनामा दिल्यानंतर ते दिल्लीत कोणाला भेटणार याबाबत सस्पेंस कायम आहे. पण ही व्हीआयपी भेट असल्याची माहिती पुढे येत आहे.
आज अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. याबाबत एका याचिकेवर सुनावणीत उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.
अनिल देशमुख हे दिल्लीत आता कोणाला भेटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अनिल देशमुख हे राजीनामा दिल्यानंतर नागपूरला जातील असं बोललं जात होतं. पण ते आता दिल्लीत येणार असल्याची माहिती पुढे आला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची आता सीबीआय चौकशी होणार आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार पुन्हा बॅकफूटवर गेलं आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. राजीनामा देण्यात उशीर झाल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्याआधी त्यांनी पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.