Andheri Fire : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेय.

Updated: Dec 18, 2018, 05:40 PM IST
Andheri Fire : मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश title=

मुंबई : आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. केंद्रीय कामगार मंत्र्यांकडून ही मदत जाहीर करण्यात आली. तर गंभीर जखमींना दोन लाख रुपयांची मदत आणि किरकोळ जखमींना एक लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेय. आगीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जे जखमी आहेत त्यांनी लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी डॉक्टर्स प्रयत्न करत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

अंधेरीतील कामगार रुग्णालयात सोमवारी लागलेल्या आगीत मृतांचा आकडा वाढला असल्याची महिती समोर येत आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या आगीतील मृतांचा आकडा आता 8 वर पोहोचला असून, येत्या काही तासांमध्ये हा आकडा वाढण्याची भीती व्यक्तहोत आहे. मृतांमध्ये एका एका चिमुकलीचा समावेश आहे. 

सध्याच्या घडीला आगीमुळे जळमी झालेल्या जवळपास 177 लोकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं असून यात अग्निशमन दलाचे तीन जवान आहेत. जखमींमध्येही भीतीचं वातावरण आहे. अंधेरीच्या कामगार रुग्णालयात सोमवारी दुपारी लागलेली आग अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर अखेर नियंत्रणात आली खरी. 

दरम्यान, आगीला घाबरून एका महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. ज्यामध्ये त्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर, दुसऱ्या एका रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.  

या ठिकाणी जखमींना दाखल

1. कुपर हॉस्पिटल, अंधेरी (पश्चिम) - 24 लोकांना दाखल करण्यात आले. यात दोघांचा मृत्यू झालाय. आता 22 जणांवर उपचार सुरु आहेत. 
2. पी. ठाकरे हॉस्पिटल (ट्रामा), जोगेश्वरी (पूर्व) - 24 लोक दाखल, दोघांचा मृत्यू. 22 जखमींवर उपचार सुरु आहेत.
3. होली स्पिरिट हॉस्पिटल, अंधेरी (पूर्व) - 48 लोक दाखल करण्यात आलेत. यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला. दोघांना उपचारानंतर घरी सोडले. आता 45 जणांवर उपचार सुरु आहेत.
4. सेव्हन हिल्स हॉस्पिटल, अंधेरी (पूर्व) - 65 लोकांना दाखल केलेय. यात 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. चार जणांचा मृत्यू झालाय. तर 15 जणांना उपचारानंतर घरी सोडले.

मृतांची नावे

(1) आसाराम पूजारम -68 (पु), 
(2) मनिषा कंगुटकर -65 (स्त्री), 
(3) तीर्थराज गुप्ता -74 (पु), 
(4) चंद्रकांत म्हात्रे - 69 (पु),  

5. हिरानंदानी हॉस्पिटल, पवईमध्ये तिघांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
6. सिद्धार्थ हॉस्पिटल, गोरेगाव - येथे दोघांना दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
7. शताब्दी हॉस्पिटल, कांदिवली येथे दाखल करण्यात आलेले बाबू खान (54) यांचा मृत्यू झालाय.