मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची कन्या मिताली यांचा सोमवारी साखरपुडा होणार आहे.
राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सोमवारी अमित आणि मिताली यांचा साखरपुडा होणार आहे.
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे गेली ५ वर्ष एकमेकांसोबत आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना दोघांची ओळख झाली होती. अमित ठाकरे पोद्दार महाविद्यालयातून पदवीधर आहे तर मिताली रुईया महाविद्यालयातून पदवीधर आहे.