अमित शाह-उद्धव ठाकरे बैठकीतून दानवे यांना वगळले?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना या बैठकीतून वगळण्यात आल्याची माहिती पुढे आलेय.

Updated: Jun 18, 2017, 12:23 PM IST
अमित शाह-उद्धव ठाकरे बैठकीतून दानवे यांना वगळले? title=

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना या बैठकीतून वगळण्यात आल्याची माहिती पुढे आलेय.

अमित शाह यांनी मातोश्रीवर पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही अमित शाह यांच्यासोबत होते. मातोश्रीमधल्या वरच्या मजल्यावर 
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ही बैठक घेतली गेली. सुमारे सव्वा तासभर ही बैठक चालली. 

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना या बैठकीतून वगळण्यात आल्याची माहिती, सूत्रांकडून मिळतेय. शेतक-यांसंदर्भात रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे दानवेंना या बैठकीतून वगळल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या बैठकीनंतर अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे मातोश्रीहून पुढल्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.