अमित शाह - उद्धव ठाकरे यांची बैठक संपली

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बैठक झाली. मात्र, बैठकीचा तपशील मिळू शकलेला नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 18, 2017, 11:41 AM IST
अमित शाह - उद्धव ठाकरे यांची बैठक संपली title=

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बैठक झाली. मात्र, बैठकीचा तपशील मिळू शकलेला नाही.

अमित शाह आज सकाळी भेट घेण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेत. राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने भाजपने सुचवलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी करण्यासाठी अमित शाह हे मातोश्रीवर पोहोचलेत. 

दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्यात वाढलेल्या दूराव्याबाबत उभय नेत्यांमध्ये बोलणे झाल्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेनेने काय भूमिका घेतली आहे, याबाबत तपशील हाती आलेला नाही. मात्र, उद्धव ठाकरे या भेटीनंतर मीडियाशी बोलणार का, याची उत्सुकता आहे.