मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा, किनाऱ्या लगतच्या भागांना सूचना

पाकिस्तानात घुसून भारतीय वायुसेनेने बालाकोट हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Updated: Feb 26, 2019, 07:07 PM IST
मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा, किनाऱ्या लगतच्या भागांना सूचना title=
मिराज २००० या विमानाने बालाकोटवर हल्ला चढविण्यात आला.

मुंबई : पाकिस्तानात घुसून भारतीय वायुसेनेने बालाकोट हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर सगळीच परिस्थिती बदलली आहे. दुसऱ्याच्या क्षेत्रात जाऊन हवाई हल्ला करणे याला 'अॅक्टक ऑफ वॉर' म्हटले जाते. या हल्ल्याने भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत. या दोन देशांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. या हल्ल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील किनाऱ्या लगतच्या भागांना सतर्क रहाण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईला जरी धोका असला तरी मुंबईकर मात्र घाबरलेले नाहीत. ते बालोकोट हल्ल्याचा आनंद साजरा करीत आहेत.

मंगळवारी पहाटे २.५०  वाजण्यासुमारास भारताने हवाई सर्जिकल स्ट्राईककरून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. मग ते पाकिस्तानी सैन्य असो की पाकिस्तान खतपाणी घालत असलेला दहशतवाद. आमशी वाकड्यात शिराल तर आम्ही तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय रहाणार नाही, हे भारताने एअर स्ट्राईक करून स्पष्ट केले आहे. हवाई हल्ले हे जरी दहशतवाद्यांच्या तळांवर केलेले असले, तरी अशा प्रकारे दुसऱ्याच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला करणे याला 'अॅक्टक ऑफ वॉर' म्हटले जाते.

मुंबई तशीही सतर्कच असते. या आधी दहशतवादाच्या झळा सोसल्यानंतर मुंबईची सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि पुलवामा सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्यानंतरच मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

याआधी अनेकदा मुंबईला लक्ष करण्यात आले आहे. १९९३ सालच्या स्फोटापासून मुंबई दहशतवादाच्या झळा सोसत आहे. आज भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांनतर मुंबईवरचा धोका वाढला असला तरी मुंबईकर मात्र डगमगलेले नाहीत ना घाबरले आहेत, अशी प्रतिक्रिया सामान्य मुंबईकराने व्यक्त केली आहे.

या हवाई हल्ल्याच्या आधी पाकिस्तान युद्धाची भाषा करत होता. कोणत्याही परिस्थितीशी निपटण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा घुमजाव पाकिस्तानने केला होता. मात्र या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमाने भीतीने माघारी फिरल्याचे वृत्त आहे.