मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आणि सैफ अली खानची पत्नी करिना कपूरला (bollywood actress kareena kapoor Corona) कोरोनाची लागण झाली. त्यामुळे राहतं घर सिल करण्यात आलं आहे. दरम्यान आता करिनामुळे तिच्या कुटुंबियांपर्यंत कोरोना पोहचलेला नाही ना, हे जाणून घेण्यासाठी आता छोटा नवाब म्हणजेच तैमूरची (Taimur Ali Khan Pataudi) आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. (Actress Kareena Kapoor and actor Saif Ali Khans son Taimur will undergo RTPCR test)
करिना कपूरसह अमृता अरोराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महापालिकेकडून तिचं घर सील करण्यात आलं आहे.
करीना कपूर आणि अमृता अरोरा सुपर स्प्रेडर?
बीएमसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करीना कपूर आणि अमृता अरोरा या सुपर स्प्रेडर असण्याचीही शक्यता आहे. दोघंही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्या अनेक बॉलिवूड स्टार्सना सतत भेटत असतात. तसंच, या दोन्ही अभिनेत्रींनी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती.