मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू तर एकाला गंभीर दुखापत

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. 

Updated: May 11, 2021, 09:14 AM IST
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू तर एकाला गंभीर दुखापत title=

रायगड : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. मुंबईकडे येणाऱ्या लेनवर खोपोली एक्झिट जवळील तीव्र उतारावर ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि पुढे थांबलेल्या असलेल्या टेम्पोवर जाऊन आदळला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. 

सध्या लॉक डाउन असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ खूपच कमी आहे त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही. अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. 

महामार्गावर दुसरा अपघात तिथूनच जवळ अमृतांजन पुलापाशी झाला. सकाळी 7.30  वाजण्याच्या सुमारास मुंबई लेनवर ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटला आहे. 

या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. लोकमान्य हॉस्पिटलच्या  ॲम्बुलन्समधून पुढील उपचारासाठी पाठवले पाठविण्यात आले आहे. 

सदर अपघातग्रस्त ट्रक आयआरबी क्रेन च्या सहायाने बाजूला करण्यात आला आहे. वाहतुकीस कोणताही अडथळा नाही. वाहतूक सुरळीत आहे.