मुंबईत अंगावर झाड कोसळून युवतीचा मृत्यू

...

Updated: Jun 10, 2018, 02:32 PM IST
मुंबईत अंगावर झाड कोसळून युवतीचा मृत्यू  title=

मुंबई : पावसानं मुंबईत एका मुलीचा बळी घेतलाय. दहिसर पूर्वेला अंगावर झाड कोसळून एका मुलीचा मृत्यू झालाय. रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दृष्टी मुंग्रा असं या मृत मुलीचं नाव असून ती १३ वर्षाची होती. एस.एन. दुबे मार्गावर ही दुर्घटना घडली.

मुंबईत झाड कोसळून चौघे जखमी

मुंबईतील दादर परिसरात अंगावर झाड कोसळून ४ जण जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. चौघांपैकी एका तरुणीला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळत आहे.

दादरमधील शिवसेना भवन परिसरात स्वामी समर्थ मठाजवळची ही घटना आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

जखमींना हिंदूजा रूग्णालयात दाखल केले असता तिघांवर उपचार करून त्यांना सोडून दिले. तर, श्रेया राऊत या २० वर्षीय तरूणीवर उद्यापही उपचार सुरू आहेत.