२० लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन

मुंबईत जवळपास 20 लाख झोपडवासियांना 300 वर्ग फूट हक्काची पक्की घर देण्याची घोषणा करत भाजपाने आगामी निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2018, 10:57 AM IST
२० लाख झोपडपट्टीवासियांना घरं देण्याचं आश्वासन title=

मुंबई : मुंबईत जवळपास 20 लाख झोपडवासियांना 300 वर्ग फूट हक्काची पक्की घर देण्याची घोषणा करत भाजपाने आगामी निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवडीतील काळाचौकी इथल्या जिजामाता चौकात संवाद सभेच आयोजन केल होत. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं देणार

यामध्ये 2000 ते 2011 पर्यंतच्या झोपडपट्टीवासियांना कागदपत्रांची पूर्तता केल्यास पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरं दिली जाणार असल्याची घोषणा शेलार यांनी केली. 

जवळपास सव्वाशे संवाद सभा आयोजित

भाजपामार्फत मुंबईत अशा जवळपास सव्वाशे संवाद सभा आयोजित करण्यात येणार आहेत. याखेरीज झोपडपट्टीत वर्षानुवर्षे पारंपरिक व्यवसाय केली होणारी जमीन संरक्षित केली जाणार असल्याचं आशिष शेलार यांनी जाहीर केलं.