फोटोग्राफर्सना मारहाणीनंतर शिल्पाने केलीए ही पोस्ट

या प्रकरणावर शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 9, 2017, 04:36 PM IST
फोटोग्राफर्सना मारहाणीनंतर शिल्पाने केलीए ही पोस्ट  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाउंसरद्वारे जखमी केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणावर शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. 

खार येथील एका हॉटेलमधून राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी डिनर करुन बाहेर पडले तेव्हा फोटोग्राफर्सनी त्यांचे छायाचित्र काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, हॉटेलच्या बाउंसरने त्यांना विरोध केला. शिल्पा कारमध्ये बसल्यानंतर बाऊंसर्सनी त्या फोटोग्राफर्सवर हल्ला केला.  या घटनेनंतर फोटोग्राफर्सनी खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर दोन बाउंसर्सना अटक करण्यात आली.
या घटनेचा व्हिडिओ सामाजिक साइटवर देखील व्हायरल होत आहे. यामध्ये दोन बाउंसर बुक्के मारताना दिसत आहेत. यामुळे फोटोग्राफर्सचे डोळे सुजलेले दिसत आहेत. 

अशी आहे शिल्पाची पोस्ट

 

Landed in Amritsar and was at the Golden Temple.. This is my Statement.. Really saddened by last nights incident #solidarity #fraternity #standbyyou

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

या घटनेबद्दल शिल्पाने दु: ख केले आहे.  "अरे देवा, ज्या पद्धतीने या फोटोग्राफर्सना मारहाण झाली त्यामुळे मी दुःखी आणि व्यथित झाली आहे. या पत्रकारांचे वाईट वाटले. बर्याचदा ते तासानतास एका फोटोसाठी उभे असतात. ते माझ्याच फिल्डमधील आहेत आणि कोणीही त्याच्या कामादरम्यान त्यांना मारहाण करणे योग्य नाही. जे घडलं त्याची मी निंदा करते. ' असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.