वाईन शॉप बाहेर मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केल्याने नाशिकमध्ये मद्यविक्री बंद

राज्य सरकारकडून दारु विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर वाईन शॉपसमोर मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Updated: May 4, 2020, 07:46 PM IST
वाईन शॉप बाहेर मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केल्याने नाशिकमध्ये मद्यविक्री बंद  title=

नाशिक : राज्य सरकारकडून दारु विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर वाईन शॉपसमोर मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्यात अनेक ठिकाणी वाईन शॉपच्या बाहेर 2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा पाहायला मिळाल्या. अनेक भागात सोशल डिस्टिन्सिंगचा फज्जा उडाला. गर्दीमुळे पोलिसांना काही ठिकाणी लाठीचार्जही करावा लागला. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी यांनी वाईन शॉप अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

दारुची दुकाने सुरु होणार म्हणून सकाळपासूनच मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाईन शॉप उघडताच मद्यप्रेमी खूश झाले. पण हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. कारण मोठी गर्दी झाल्यामुळे नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा वाईन शॉप बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

मद्यविक्रीला काही अटीनुसार परवानगी देण्यात आली आहे. पण कोरोना सारखा आजार पसरत असताना मद्यप्रेमींकडून कोणतीच काळजी घेतली जात नाहीये. राज्यात कंटेनमेंट झोन वगळून मद्य विक्रीला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. पण नाशिकच नाही इतर जिल्ह्यांमध्ये ही असंच चित्र आज पाहायला मिळालं.