का होतेय 'सहावीला पिंपरी चिंचवडला आलो'ची चर्चा?

या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 

Updated: Dec 5, 2021, 12:12 PM IST
का होतेय 'सहावीला पिंपरी चिंचवडला आलो'ची चर्चा?  title=

पिंपरी चिंचवड : सध्या सोशल मीडियामुळे बरेच ट्रेंड व्हायरल होत असतात. एकाने तो ट्रेंड केला की, मग सगळेच एकामागोमाग तो ट्रेंड करु लागतात. मग त्या ट्रेंडचा अर्थ कोणाला कळो न कळो, लोकं त्याला फॉलो करतात. हे तर झालं सोशल मीडियाचं परंतु सध्या पिंपरी चिंचवड शहरात एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. हा ट्रेंड आहे पोस्टर बाजीचा, यामध्ये एका पोस्टरवरती लोक काही ना काही मजकूर लिहितात, जो व्हायरल होत आहे.

यापूर्वी चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी ‘शिवडे, आय एम सॉरी’ (SHIVDE I AM SORRY') हा मजकूर पाहायला मिळत होता. ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू होती की, हा मजकुर नक्की कोणासाठी आणि का व्हायरल होत आहे. त्यातच आता आणखी एक पोस्टरबाजी व्हायरल होताना दिसत आहे. तो म्हणजे ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो.'

या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मिडीयावर या फिरत असणाऱ्या फोटोमुळे सर्व नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. हा नेमका विषय तरी काय? हे जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये चुळबुळ दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरीत‘स्मार्ट बायका कुठे जातात’ असा असा मजकूर लिहलेला पोस्टर व्हायरल झाला होता. त्यानंतर ‘शिवडे, आय एम सॉरी’ या पोस्टरचीही मोठी चर्चा होत होती. याशिवाय भोसरी परिसरात देखील ‘हे माझं चुकलं का?’ असे फ्लेक्स लावून नगरसेवक रवी लांडगे यांनी त्यांच्या पक्षांतर्गत असलेला वाद सगळ्यांसमोर उघड केला होता.

माजी आमदार विलास लांडे यांनी ‘आता हवा पिंपरी चिंचवडला फक्त घड्याळाचा गजर’ अशा मजकुराचे फलक लावल्याचे देखील लोकांनी पाहिली आहे. त्यानंतर आता ‘सहावीला पिंपरी चिंचवडला आलो’ अशा फ्लेक्समुळे पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.