समुद्रकिनाऱ्यावर दोन महिला पर्यटक पॅरासेलिंग करत असताना अचानक दोरी तुटली आणि...

अलिबागच्या समुद्रात एक जीवघेणार थरार पाहायला मिळाला. पॅरासेलिंगदरम्यान अचानक दोरी तुटल्यानं दोन महिला समुद्रात कोसळल्या

Updated: Dec 4, 2021, 10:53 PM IST
समुद्रकिनाऱ्यावर दोन महिला पर्यटक पॅरासेलिंग करत असताना अचानक दोरी तुटली आणि... title=

प्रफुल्ल पवार झी 24 तास अलिबाग : समुद्रकिनाऱ्यावर पॅरासेलिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. पॅरासेलिंग करताना एक छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. अलिबागमध्ये दोन महिला पर्यटक पॅरासेलिंग करत असताना अचानक दोरी तुटली, त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा. (2 womens parasailing when the rope keeping them attached to the boat snapped and they fell into the middle of ocean at varsoli beach alibaug)

अलिबागच्या समुद्रात एक जीवघेणार थरार पाहायला मिळाला. पॅरासेलिंगदरम्यान अचानक दोरी तुटल्यानं दोन महिला समुद्रात कोसळल्या. अलिबागच्या वर्सोली समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडलीय. दोरी तुटल्यानंतर जवळपास 100 फुट उंचावरून या महिला खाली कोसळल्या. पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट.

अलिकडे गोव्याप्रमाणे राज्यातल्या समुद्रकिनाऱ्यांवरही  साहसी खेळांचं प्रमाण वाढलंय. यात बहुतांश पर्यटकांची पसंती असते ती पॅरासेलिंगला. मात्र तुम्ही करत असलेलं पॅरासेलिंग सुरक्षित असेलच असं नाही. आता हे दृश्य पाहा...

काळजाचा थरकाप उडवणारं हे दृश्य आहे अलिबागजवळच्या वर्सोली बीचवरचं. इथं दोन महिला पर्यटक पॅरासेलिंग करत होत्या. मात्र अचानक पॅराशूटची दोरी तुटली आणि दोन्ही पर्यटक 100 फूट उंचावरून थेट खोल समुद्रात कोसळल्या.

मुंबईच्या सुजाता नारकर आणि सुरेखा पाणीकर यांच्याबाबतीत हा प्रकार घडलाय. नशिबाची साथ आणि लाईफ जॅकेटमुळे दोघीही बराच वेळ समुद्रात तरंगत राहिल्या. त्यानंतर धावाधाव करत या महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली.

या प्रकारामुळे झी 24 तासने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

'झी 24 तास'चे सवाल

पैसे कमावण्याच्या नादात पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का ?

अलिबागमध्ये घडलेल्या घटनेला जबाबदार कोण ?

पॅरासेलिंग व्यवसाय करणा-यांना सुरक्षेच्या नियमांचं बंधन नाही का ?

नियमांचं उल्लंघन होत असेल तर कारवाई काय होते ?

त्यामुळे पॅरासेलिंग करताना काळजी घ्या. नशिबाची दोरी बलवत्तर होती म्हणून या महिलांचा जीव वाचला. मात्र प्रत्येकवेळी असं घडेलच असं नाही.