आघाडीत लग्न कुणाचं आणि बिनबुलाए वऱ्हाडी कोण? काय म्हणाले नेमकं खासदार सुजय विखे

काँग्रेस बिनबुलाए वऱ्हाडी आहेत. त्यांना कितीही बोललं तरी ते जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत. 

Updated: Mar 27, 2022, 02:30 PM IST
आघाडीत लग्न कुणाचं आणि बिनबुलाए वऱ्हाडी कोण? काय म्हणाले नेमकं खासदार सुजय विखे title=

लैलेश बारगजे, अहमदनगर, झी मीडिया : अहमदनगर येथे जिल्ह्यातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी विखे फाउंडेशनच्यावतीने मोफत CET आणि NEET कोर्स घेतला जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जात आहे. या चाचणी केंद्राला अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट दिली यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर शेलक्या शब्दात टीका केली.

राज्यातील काँग्रेस बिनलाजे झाले आहे. शिवसेना मुक्या बायकोच्या भूमिकेत तर राष्ट्रवादी त्रास देणाऱ्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे, अशी टीका खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

महाविकास आघाडीच्या संसारात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं लग्न आहे. राष्ट्रवादी हे नवऱ्याच्या भूमिकेत तर शिवसेना मुक्या बायकोच्या भूमिकेत आहे. काँग्रेस बिनबुलाए वऱ्हाडी आहेत. त्यांना कितीही बोललं तरी ते जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत अशी टीका भाजप खासदार सुजय विखे यांनी केली.