नवी दिल्ली : Harish Salve In Supreme Court Shiv Sena Vs Eknath Shinde Group Hearing : पक्षात लोकशाही असली पाहिजे. आता शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत आहेत. 1969 मध्येही काँग्रेसबाबतही हेच घडले होते. बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीलाच पक्ष समजण्याची चूक करतो. पण पक्षातील बहुतांश आमदार मुख्यमंत्र्यांच्या कारभाराबाबत समाधानी नसतील. त्यांना बदल हवा असेल तर ते नवा नेता का निवडू शकत नाहीत, असा युक्तिवाद एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील हरिश साळवे (Harish Salve) यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.(शिवसेना कोणाची?, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद वाचा)
नेता भेटत नाही म्हणून तुम्ही नवीन पक्ष स्थापन करणार का, असा सवाल एकनाथ शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना सरन्यायाधीश यांनी विचारला. त्यावेळी शिंदे गटाचे वकील म्हणाले, मी पक्षातच आहे.
सरन्यायाधीश : तुम्ही आता कोण आहात?
शिंदे गटाचे वकील : मी पक्षातील एक नाराज सदस्य आहे.
शिंदे गटाचे वकील : आम्ही एकच पक्ष आहोत फक्त पक्षाचा नेता कोण एवढाच वाद आहे
शिंदे गटाचे वकील : मी शिवसेनेचा भाग आहे, पक्षातही लोकशाही असली पाहिजे. पण पक्षात दोन गट झाल्याचे माझे म्हणणे आहे.
शिंदे गटाचे वकील : १९६९ मध्ये काँग्रेसमध्येही असेच घडले होते
हरीश साळवे : निवडणुका येतात, त्यामुळे मूळ पक्ष कोण? चिन्ह कुणाकडे यासाठी निवडणूक आयोगाकडे अपिल केले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक येत आहे, अशावेळी एका पक्षाचे दोन गट असता कामा नये.
हरिश साळवे : पक्षांतर बंदी कायदा हा आपल्याच पक्षाचा विश्वास गमावलेल्या नेत्याच्या संरक्षणासाठी आयुध म्हणून वापरता येता नाही.
शिवसेनेचे वकील सिंघवी : केवळ बहुमताच्या जोरावार ते कायदेशीर वैधता मिळवून घेऊ शकत नाही
शिंदे गटाचे वकील : ज्या नेत्यांकडे बहुतम नाही त्यांना सदस्यांना अडकवण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्याचा हत्यार म्हणून वापर करता येत नाही
शिवसेनेचे वकील : नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि बंडखोर गटाच्या मागण्या तातडीने मान्य केले
शिंदे गटाचे वकील : ज्या नेत्यांकडे बहुतम नाही त्यांना सदस्यांना अडकवण्यासाठी पक्षांतर बंदी कायद्याचा हत्यार म्हणून वापर करता येत नाही.
शिंदे गटाचे वकील : आम्ही एकच पक्ष आहोत फक्त पक्षाचा नेता कोण एवढाच वाद आहे.
एकनाथ शिंदे गटाचे आमदार अद्याप शिवसेनेतच आहेत. ते विरोधी मतांचे असले तरी अद्याप पक्षातच आहेत. पक्षात लोकशाही असली पाहिजे. शिवसेना पक्षात आता दोन गट पडले आहेत, याकडे हरिश साळवे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रता याचिकेसह इतर याचिकांवर सुनावणी झाली. यावेळी हरिश साळवे यांनी शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, शिवसेनेने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात युक्तिवाद करताना हरिश साळवे युक्तीवाद केला. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि निवडणूक आयोगाकडे असलेले प्रकरण यांची सरमिसळ करु नका. या दोन्हींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असा साळवे यांनी यावेळी युक्तीवाद केला.