शरद पवारांची 'लेडी जेम्स बॉन्ड'; संकटाच्या काळात खंबीर साथ देणारी 'ती' आहे तरी कोण?

Who is Sonia Doohan? शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला, त्यावेळी पिवळा कुर्ता, बॉप कट अन् डोळ्यांवर चष्मा, असा पेहराव असलेली एक महिला शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या मागे बसलेली दिसली. ती महिला नेमकी कोण? असा सवाल सर्वांना पडला.

सौरभ तळेकर | Updated: May 6, 2023, 10:25 PM IST
शरद पवारांची 'लेडी जेम्स बॉन्ड'; संकटाच्या काळात खंबीर साथ देणारी 'ती' आहे तरी कोण? title=
Sonia Doohan,Sharad Pawar,Lady James Bond

Sharad Pawar, Sonia Doohan: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) एकच खळबळ उडाली होती. पवारांनी अचानक निर्णय जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची देखील तारंबळ उडाली. अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील, छगन भुजबळ आणि इतर बड्या नेत्यांनी शरद पवार यांची समजूत घातण्याचा प्रयत्न केला.  त्याचबरोबर इतर युवा नेत्यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली. यात आघाडीवर होते रोहित पवार. राजीनाम्याच्या घोषणेनंतर रोहित पवार (Rohit Pawar) सात्त्याने शरद पवार यांच्यासह सावलीसारखे दिसत होते. राजीनामा मागे घेतला, त्यावेळी देखील रोहित पवार शरद पवार यांच्या बाजूला बसले होते. त्यावेळी सर्वांच्या नरजेत एक चेहरा भारला गेला. 

शरद पवार यांनी राजीनामा (Sharad Pawar Resignation) मागे घेतला, त्यावेळी पिवळा कुर्ता, बॉप कट अन् डोळ्यांवर चष्मा, असा पेहराव असलेली एक महिला शरद पवार यांच्या मागे बसलेली दिसली. ती महिला नेमकी कोण? असा सवाल सर्वांना पडला होता. या महिलेचं नाव 'सोनिया दुहन'... खरं तर पवारांच्या मागे होती ती 'यंग ब्रिगेड'. रोहित पवार, संग्राम जगताप, संदीप क्षीरसागर, संजय बनसोडे आणि सक्षणा सलगर हे युवा नेते उपस्थित असल्याने शरद पवार यांनी नेमके कोणते संकेत दिलेत? असा सवाल देखील उपस्थित होतोय. मात्र, खरी चर्चा रंगली ती सोनिया दुहन (Sonia Doohan) यांची.

शरद पवार यांची ही पत्रकार परिषद ठरली ती सोनिया दुहन यांच्या उपस्थितीने. सोनिया दुहन या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्याचबरोबर त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी देखील आहेत. शरद पवार यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख.  2019 साली ज्यावेळी अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी घेतला, त्यावेळी सोनिया दुहन यांचं नाव समोर आलं. शरद पवारांनी पहाटेचा गोंधळ आटोपला, पण ठाकरे सरकार स्थापन होण्याआधी आमच्याही आमदारांना हरियाणाच्या हॉटेलमध्ये बंद करून ठेवण्यात आलं होतं, असं शरद पवार म्हणाले होते. या प्रकरणानंतर पवारांनी सुत्र हातात दिली ती दिल्लीत असलेल्या सोनिया दुहन यांच्याकडे.
 
ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या 'चेकमेट : हाऊ द बीजेपी वन अँड लॉस्ट द स्टेट' या पुस्तकातील माहितीनुसार, चार आमदार गुड़गावच्या हॉटेलमध्ये असल्याचं सोनिया दुहन यांना सांगितलं गेलं.  राजस्थानमध्ये सुरू असलेलं बहिणीचं लग्न सोडून सोनिया यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची थरारक सुटका केली आणि सुरक्षित त्यांना महाराष्ट्रात पोहोचवलं. भाजपच्या 100 कार्यकर्तांना चकमा देत 4 आमदारांना हॉटेलच्या बाहेर काढणं आणि महाराष्ट्रात वाया दिल्ली पोहोचवणं हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत थ्रिलर किस्सा मानला जातो. 

आणखी वाचा - Raj Thackeray: 'अजित पवारांमुळे भीतीपोटी शरद पवारांनी...'; राज ठाकरेंची अजितदादांवर सडकून टीका!

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. त्यावेळी देखील पवारांनी विश्वास दाखवला तो सोनिया दुहन यांच्यावर. याबाबत विस्तृत माहिती कधी समोर आली नाही. मात्र, याच काळात गोव्यात सोनिया दुहन यांना अटक झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पवारांचा सोनिया यांच्यावरील विश्वास किती जबरा होता, याची प्रचिती येते. त्याचबरोबर झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी शरद पवारांना युवा नेत्यांना वर मुख्यप्रवाहात आणायचं आहे. परंतू याला काही नेत्यांचा विरोध होता, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आगामी काळात शरद पवार युवा नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या देखील टाकू शकतात.