स्वयंघोषित 'हिंदूजननायक' हे कुठलं ताम्रपट? दीपाली सय्यद यांनी साधला मनसेवर निशाणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मनसेवर अभिनेत्री दीपाली सययद यांनी निशाणा साधलाय

Updated: May 14, 2022, 11:56 AM IST
स्वयंघोषित 'हिंदूजननायक' हे कुठलं ताम्रपट? दीपाली सय्यद यांनी साधला मनसेवर निशाणा title=

जुन्नर : मनसे प्रवक्ते योगेश चिले ( MNS Yogesh Chile ) यांनी शिवसेनेच्या आज होणाऱ्या सभेत उद्धवजी ठाकरे ( Uddhav Thackarey ) यांनी आज जर 'औरंगाबाद'चे नामकरण 'संभाजीनगर' केलं तरच त्यांचं हिंदूत्व असली माना असा टोला लगावला आहे. यावरून अभिनेत्री दीपाली सय्यद ( Dipali Sayyad ) यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलंय.

जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी दीपाली सय्यद ( Dipali Sayyad ) आल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, 'योगेश चिले कोण आहेत हे मला माहीत नाही. पण, त्यानिमित्ताने मनसेला कोणी प्रवक्ते आहेत हे जनतेला माहीत झाले.

अमित ठाकरे यांना कुठलीही नोटीस जाहीर केली नाही. उद्धव साहेबांनी त्यांच्यावर ही मेहरबानी केली आहे याची कल्पना राज ठाकरे यांना असली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

कुठलीही सहनशीलता ही निवडणुकीपर्यंत मर्यादित असते. तुम्ही स्वयंघोषित 'हिंदूजननायक म्हणून कुठलंही ताम्रपट मिळवलेलं नाही' अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी मनसेवर निशाणा साधलाय.